maharashtra karnataka border dispute 2023 / ह्याच कारणामुळे कर्नाटक "बेळगाव" महाराष्ट्राला देत नाहीये!

  नमस्कार मित्रांनो , dhdakebaj ब्लॉग मध्ये आपल  स्वागत आहे .भारत पाकिस्तान सीमावाद, किंवा भारत चिन सीमावाद तुम्हाला ठाऊक असेल, पण असाच सीमावाद आपल्या भारतातील दोन राज्यांमधे पाहायला भेटतो, तो म्हणजे , महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद (maharashtra karnatak border dispute) , सीमावाद आहे बेळगाव जिल्ह्या विषयी,बेळगाव महाराष्ट्रात सामील केले गेले पाहिजे यासाठी महाराष्ट्र आणि बेळगाव ची जनता जवळपास 70 वर्षापासून प्रयत्न करतेय, कारण बेळगावात 60℅ अधिक मराठी भाषीक असल्याने हा भाग महाराष्ट्राचा आहे, असे दावे केले जातात, नेमके काय कारण होते की मराठी भाषीक असलेला बेळगाव हा प्रदेश कर्नाटकला जोडण्यात आला आणि जर हा प्रदेश महाराष्ट्राचा आहे तर कर्नाटक राज्य का हा प्रदेश महारष्ट्राला देत नाहीये , समजून घेऊ यात ह्या blog मार्फत.

maharashtra karnataka border dispute


maharashtra karnataka border dispute history.

Bombay Presidency. 

Blog ची सुरुवात होते जेव्हा भारतावर इंग्रेजाँच राज्य होते, त्यावेळेस आत्ता चा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकचा काहीसा भाग हा bombay presidency under होता. 

State Reorganisation Act. 

  1947 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले. पंडित नेहरुनी भारताची restructuring करायला सुरवात केली.   सन 1956 मधे भारतीय संसदेत state reorganisation act पास करण्यात आला. 

ह्या act नुसार भारतातील राज्यानां भाषा, संस्कृति आणि भौगोलिक स्तिथि नुसार वेगळे करण्यात येणार होते. 

 1 नोव्हे 1956 रोजी म्हैसूर राज्य म्हणजे सध्याचे कर्नाटक हे bombay state पासून वेगळे झाले आणि मराठी भाषिक असलेल बेळगाव हे म्हैसूर राज्याला जोडण्यात आले. ह्या मुळे बेळगावतील जनता आणि सयुक्त महाराष्ट्र परिषद ह्यानी protest करायला सुरुवारत केली आणि ह्या protest दरम्यान जवळपास 105 हुतात्म्यानी आपल रक्त सांडल. 

Bombay Seperation (महाराष्ट्र, गुजरात फाळणी). 

 बेळगावचा लढा चालूच होता , 1960 च साल उजाळल आणि नको असेलेले घडले. 1 मे 1960 ला भाषेच्या अाधारावर मराठी बोलणाऱ्यांसाठी महाराष्ट्र आणि गुजरातींसाठी गुजरात हे राज्य bombay state म्हणजे मुंबई राज्यातून वेगळे करण्यात आले. तुम्हाला जर महाराष्ट्र आणि गुजरात seperation विषयी अजून जाणून घ्यायच असेन तर तुम्ही हा video बघू शकता, ह्याच्यात मि bombay seperation विषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे ,

चला आता विषयावर परत येऊ . 

  महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य वेगळी तर झाली पण बेळगाव मात्र अजूनही कर्नाटक राज्यातच ठेवण्यात आले ह्यामुळे बेळगाव ची जनता अजून जास्त संतप्त झाली. 

Mahajan Commission 1966

 सन 1966 

 सेनापती बापट, बारस सुन्ठनकर, साईनाथ पुंडलिकजी काटभरे ह्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या घरासमोर fast unto death protest चालू केले. 

 हा protest थांबवण्यासाठी केंद्राने 25 oct 1966 रोजी एक कमिटी स्थापन केली जिला mahajan commission असे सुद्धा म्हणतात जिचे अध्यक्ष होते माजी न्यायाधिश फकीरचंद्र महाजन. 

  पुढच्या वर्षी म्हणजे 1967 ला mahajan commission चा रिपोर्ट येतो, ह्या रिपोर्ट मधे 814 खेड्यांपैकी 262 खेडे महाराष्ट्राला द्यावी आणि बदल्यात महाराष्ट्राने सोलापूर सह 247 खेडे कर्नाटकला द्यावी व बेळगाव हा कर्नाटकचाच भाग राहिल असा एक तरफा निकाल ह्या commission ने दिला, ह्या रिपोर्ट चा बेळगाव वशियानी आणि महाराष्ट्र एकीकरण समिति ने निषेद केला. 

  पुढे जाऊन ह्याच वर्षी बाळासाहेब ठाकरेंनी बेळगाव आणि कारवार सहित इतर मराठी भाषीक प्रदेश हे गोव्यात समावेश करा असा तोडगा दिला पण तोही निष्फल ठरला. 

  1969 मधे शिवसेनेच्या कार्यकरतांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई ह्यांची गाडी अडवली, ह्या protest दरम्यान 67 शिवसैनिक हुत्मामा झाले. 


  आंदोलनाने मार्ग सुटत नसेल तर न्यायालयाने ह्यावर मार्ग काढू ह्या आशेने 30 मार्च 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली , पण आजपर्यंत ह्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निकाल काही जाहिर झाला नाही. 

ह्याच  कारणामुळे कर्नाटक "बेळगाव" महाराष्ट्राला देत नाहीये! 

  1973 मधे उमाकृष्ण दीक्षित ह्यांनी बेळगाव च्या बदल्यात कर्नाटकला जिल्हा मुख्यालयासाठी 100 कोटी देऊ असा तोडगा दिला, तरी देखील कर्नाटक राज्याने नकार दाखवला. पूर्ण जिल्ह्याची जनता 70 वर्षा पासून आंदोलन करतेय , जिल्ह्या मुख्यालयासाठी पैसे देखिल देऊ करताय तरीही कर्नाटक का आपल्या जिद्दीवर का अडून बसलय? 

The Real Kerala story. 👇

 ह्या माघील पहिल कारण आहे 

1. Revenue , बेळगाव मधुन कर्नाटकने वर्ष 2021-22 मधे 3974 crore GST collect केला होता. ह्याच्या वरून तुम्ही अंदाज लावू शकता की बेळगाव शहर किती develope आहे ते. 

2. बेळगाव हे शहर दोन्ही राज्यांचा सीमेवरती असल्याने transportation साठी खूप महत्वाच आहे. 

3. बेळगाव हे शहर उद्योगांच माहेर घर आहे अस म्हटले तरी वावग ठरणार नाही, कारण येथे number of industries आहेत ज्यात manufacturing, it and health care सारख्या मोठ्या industries आहेत. 

4. बेळगाव हे आर्थिक केन्द्र आहे त्यामुळे कर्नाटक ने बेळगाव मधे सर्व पायाभूत सुविधा केल्या आहेत. 

  आता ह्या सर्व बाबी बघता कर्नाटकला महाराष्ट्र सरकारने कितीही रक्कम देऊ केल्यास कर्नाटक सरकार सोन्याच अंड देणाऱ्या ह्या बेळगाव सारख्या शहराला कधी देऊ शकेल की नाही हे तर भविष्याच सांगेल. 

 ह्या सीमावाद विषयी अजून जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा 👇



No comments

Powered by Blogger.